नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या दौऱ्यावर, संघ पहिल्या 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळेल, त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळेल. बीसीसीआयने (bcci) यापूर्वीच कसोटी संघ जाहीर केला आहे, तर वनडे संघ अद्याप जाहीर झालेला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडबद्दल (Ruturaj Gaikwad) माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) म्हणाले, ‘त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळाले पाहिजे. आता त्याला स्थान मिळवण्यासाठी आणखी किती धावा कराव्या लागतील? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिलीप वेंगसरकर म्हणाले, ‘तुम्ही फॉर्मात असलेले खेळाडू निवडले पाहिजेत. ऋतुराज गायकवाडला संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी किती धावा कराव्या लागतील? आता निवडकर्त्यांनी त्याला संघात घेण्याची आणि योग्य संधी देण्याची वेळ आली आहे. ऋतुराज गायकवाडही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. ऋतुराज 18 किंवा 19 वर्षांचा खेळाडू नाही, तो 24 वर्षांचा खेळाडू आहे आणि त्याला आता संधी द्यायला हवी. 28 वर्षांचे झाल्यावर त्यांची निवड केली जाईल का? असा खोचक सवाल देखील निवड समितीला विचार आहे.
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील शानदार कामगिरीनंतर महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही चमकदार कामगिरी केली. गायकवाडने गेल्या चार दिवसांत तिसरे शतक झळकावले आहे. महाराष्ट्र आणि केरळ यांच्यात शनिवारी राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात गायकवाडने 110 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने 129 चेंडूत 124 धावा केल्या.
याआधी महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 112 चेंडूत 136 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 14 चौकार आणि 4 षटकार मारले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने छत्तीसगडविरुद्ध नाबाद १५४ धावांची खेळी करून सामना जिंकला. त्याने 143 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि 5 षटकार ठोकले. पहिल्या तीन सामन्यांमध्ये तीन शतकांसह केवळ तीन डावांत तो आता स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा (414) ठरला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पृथ्वी शॉ (827) आणि देवदत्त पडिककल (737) यांच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- जितेंद्र आव्हाडांचा विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न; केली महत्वाची घोषणा
- ‘आव्हाडसाहेब, जमत नसेल तर मंत्रिपद सोडा, कुंपणच शेत खात असेल तर….’
- गरिबातल्या गरीब फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत गोपीनाथ गड पोहोचवण्याचा संकल्प! पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन


