नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने ऋतुराज गायकवाडवर (Ruturaj Gaikwad)मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश चोप्राच्या (Aakash Chopra) मते, ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, ते पाहता त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे संघात स्थान मिळू शकते.
ऋतुराज गायकवाडने विजय हजारे करंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने एकूण 603 धावा केल्या आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चार जबरदस्त शतके झळकावली. ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करण्यापूर्वी आयपीएलमध्येही जबरदस्त कामगिरी केली होती. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने 16 सामन्यात 45.35 च्या सरासरीने 635 धावा केल्या. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि त्याने ऑरेंज कॅपही जिंकली होती.
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऋतुराज गायकवाडच्या विजय हजारे ट्रॉफीमधील उत्कृष्ट कामगिरीला उदंड प्रतिसाद दिला. या संदर्भात तो म्हणाला, ऋतुराज गायकवाडने विजय हजारे करंडक स्पर्धेत चार शतके झळकावली आणि एका क्षणी तीन सामन्यांमध्ये सलग तीन शतके झळकावली होती. त्याला बाहेर काढणे कोणालाच शक्य नव्हते. त्याची काही खेळी मी पाहिली आणि त्याला बघून जणू तो मुलांसमोर खेळत होता असे वाटत होते. ऋतुराज गायकवाड भारतीय संघासाठी सज्ज झाला आहे. तुमच्याकडे रोहित शर्मा आणि केएल राहुल आहेत. याशिवाय शिखर धवनचाही पर्याय आहे. मात्र ऋतुराज गायकवाडच्या नावावर नक्कीच चर्चा होईल. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र ‘हे’ कदापि सहन करणार नाही; काँग्रेसचा इशारा
- इंदिरा गांधींचे नाव घ्यायला भय वाटते की लाज वाटते?
- अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासन कटिबद्ध- नवाब मलिक’
- ‘एकटा कर्मदरिद्री खासदार विनायक राऊत सोडला तर…’, निलेश राणेंचा हल्लाबोल
- …तर देशात दिवसाला १४ लाख कोरोना रुग्ण सापडतील- व्ही. के. पॉल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

