🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे शिल्पाच्या कामावर त्याच्या परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘सुपर डान्सर-४’ या शो मध्ये शिल्पा परीक्षक म्हणून काम करत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून शिल्पाने शेट्टी ‘सुपर डान्सर-४’ शूटिंग करणं रद्द केलं आहे. त्यामुळे आता या शोमध्ये शिल्पाच्या जागी वेगवेगळे पाहुणे कलाकार पाहायला मिळत आहे.
मागील एपिसोडमध्ये अभिनेत्री करिश्मा कपूर पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता येत्या भागामध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया उपस्थितीत राहणार असल्याचे समजत आहे. रितेश आणि जेनेलिया यांना निर्मात्यांनी शोसाठी विचारले असता त्यांनी होकार दिला आहे. या वेळी गीता कपूर आणि अनुराग बासूसोबत रितेश आणि जेनेलिया दिसणार आहेत.
बॉलिवूड मधील क्युट कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या जोडीकडे पाहिलं जातं. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश देशमुख आणि जेनेलिया सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. रितेश नेहमीच काही न काही सोशल मीडियावर शेअर करत असतो. रितेश नेहमीच आपल्या हटके पोस्टमुळे चर्चेत असतो.
महत्त्वाच्या बातम्या
- सोनू सूदने केला ढाबा सुरु; पाहायला मिळाला चपाती तयार करताना
- माहीचा ‘तो’ लुक सोशल मीडीयावर तुफान व्हायरल
- श्रीलंका दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे संजुचे करिअर धोक्यात
- पृथ्वीच्या संघातील पुनरागमनामुळे कर्णधार धवनचीच जागा धोक्यात
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
