Share

रितेश देशमुख सुध्दा झाला होता बेरोजगार; धक्कादायक खुलासा…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विनोदी भूमिका असो किंवा खलनायकाची भूमिका असो आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता रितेश देशमुख. मराठी, हिंदी सिनेमाच्या माध्यमाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेता रितेश आणि जिनिलिया दोघेही सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. मात्र नुकतच त्याने एक मोठं वक्तव्य केल्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान रितेश आणि जेनेलिया टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसून आले होते. अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात दोघे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी बरेच अनुभव शेअर केले होते. कोरोना काळात रितेश आणि जेनेलिया च्या टिकटॉक व्हिडिओंनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. मात्र, सरकारने टिकटॉकवर बंदी घातली. ज्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अभिनेता रितेश देशमुखने सुद्धा टिकटॉक बंद झाल्यानंतर मी पूर्ण बेरोजगार झालो होतो, असा धक्कादायक खुलासा केला आहे. कोरोना काळात रितेश आणि जिनिलियाच्या टिकटॉक व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दोघांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केल होत. खुद्द रितेश देशमुखने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. रितेश देशमुखने टिकटॉक बंद झाल्याने बेरोजगार झाल्यासारखं वाटत होते, असे ही सांगितले आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जेव्हा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले गेले. त्या काळात त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपण चाहत्यांना हसवू शकतो या उद्देशाने  व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती.

https://www.instagram.com/reel/CU1wpPJDY7P/?utm_medium=copy_link

या व्हिडिओला चाहत्यांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र ऍप बंद करण्याचा निर्णयामुळे तो खूपच चिंतेत पडला होता. आपण जणू बेरोजगार झालोय असेच त्याला त्यावेळी वाटतं होते. तो विचार करू लागला की,’देवा आता मी काय करू, एकच काम होत ते सुद्धा गेले,’असे म्हणत टिकटॉक बंद झाल्यानंतर नाराजी व्यक्त केल्याचे रितेश देशमुखने सांगितले. त्याचवेळी त्यांना रील्स बनवण्याची कल्पना सुचली. त्यानंतर रितेश आणि जिनिलिया दोघेही रील्स बनवू लागले. इंस्टाग्रामवर त्यांच्या रील्स चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. आज ही त्यांची जोडी सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमाने चाहत्यांचे मनोरंजन करतांना दिसतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!