Share

इंग्लंडची दाणादाण उडवत दमदार षटकाराने रिषभ पंतचं धडाकेबाज शतक !

Published On: 

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी केली. मात्र, या निर्णयाचा भारतीय गोलंदाजांमुळे इंग्लंडला चांगलाच पश्चाताप झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याआधीच इंग्लंडचा संघ २०५ धावांवर बाद झाला.

यानंतर, भारतीय संघ फलंदाजीला उतरला. मात्र, पहिल्या दिवसाखेर शुबमन गिल याची विकेट गमावून भारताला २४ धावा करता आल्या. आज सकाळी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी सुरुवात केली. २३ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पुजारा बाद झाला. यानंतर लगेचच, कर्णधार विराट कोहली याला खातं न उघडताच शून्य धावांवर माघारी फिरावं लागलं.

तर, रोहित शर्माचं अर्धशतक अवघ्या एक धावेने हुकलं. १४४ चेंडूंमध्ये ४९ धाव बनवून रोहित शर्मा बाद झाला. यानंतर, अजिंक्य रहाणे व आर अश्विन फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. मात्र, रिषभ पंत याने भारतीय संघासाठी महत्वपूर्ण शतक बनवत भारताचा डाव सावरला आहे. वॉशींग्टन सुंदर आणि रिषभ पंत यांच्या भागिदारीने भारताने इंग्लंडवर आघाडी मिळवली आहे.

रिषभ पंत याने दमदार षटकार ठोकून शतक केलं. यानंतर, उपस्थितांनी त्याला उभं राहून दाद देखील दिली. हे त्याच तिसरं कसोटी शतक ठरलं आहे. ११८ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्यानंतर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर रिषभ पंत झेलबाद झाला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!