Share

आक्रमक पंकजा मुंडे ‘या’मुळे झाल्या भावनिक!

Published On: 

बीड : माजी मंत्री पंकजा मुंडे या त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ओळखल्या जातात. मंत्री पदावर असताना त्यांनी अनेक आंदोलने केली आणि त्यावेळी विरोधी पक्षाला चांगलाच घाम फोडला होता. सध्या त्या विधीमंडळात नसल्या तरी त्यांनी त्यांचा आक्रमक पावित्रा कायम ठेवला आहे. पंकजा मुंडेंची आक्रमक भूमिका आपल्याला परिचित असली तरी त्यांची दुसरी बाजू सुद्धा बघायला मिळाली.

गुरुवारी त्या बीड जिल्ह्यातील पांगरी या गावी असलेल्या गोपीनाथ गडावर दर्शनासाठी गेल्या होत्या. तिथे नवदांपत्य सुद्धा दर्शनासाठी आलेलं पाहून पंकजा मुंडे भावनिक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी त्या वधू-वरांना भेटून वैवाहिक जीवनासाठी सदिच्छा दिल्या तसेच शुभाशीर्वाद दिले. त्यांच्या सोबतचे काही फोटो सुद्धा पंकजा मुंडेंनी त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. बीड जिल्ह्यातील पांगरी येथे असलेल्या गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या दर्शनासाठी राज्यातून अनेक लोकं भेट द्यायला येतात. गोपीनाथ मुंडेंचे चाहते तसेच त्यांना देव मानणारे अनेक लोकं इथे नेहमी येतात.

दरम्यान, पक्षाची सत्ता गेल्यानंतर पंकजा मुंडे यांच्याकडे सध्या कुठलं मंत्रीपद नसलं तरी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या १२ आमदारांच्या वक्तव्यावर मुंडेंनी चांगलीच टीका केली होती. अजित पवारांचं विधान दुर्दैवी आहे, ते कुठल्या राजकीय बुद्धीने काम करतात हे कळतच नाही अशा शब्दात पंकजा मुंडेंनी टीका केली होती.
अजित पवारांनी विधानपरिषदेच्या १२ आमदारांबाबत विधान केल्याने विरोधी पक्षाने त्यावर जोरदार आक्षेप घेतला होता, त्यावेळी पंकजा मुंडेनी सुद्धा त्यांच्यावर निशाना साधला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!