Share

…म्हणून ममतादीदींनी मानले शिवसेनेचे ‘विशेष’ आभार !

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.

सद्या, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरकार आहे. आता, बंगालच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपसमोर कडवं आव्हान उभं केलं असतानाच त्यांना देशभरातून भाजप विरोधी पक्षांनी पाठींबा जाहीर केला आहे. पश्चिम बन्गल निवडणुकांमध्ये उतरण्याची शक्यता असलेल्या शिवसेनेनं देखील कालच ममता बॅनर्जी यांना पाठींबा जाहीर केला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आज आपल्या २९१ उमेदवारांची यादी घोषित केली आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील उपस्थित होत्या. यानंतर, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी यांनी पाठींबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. यात त्यांनी शिवसेनेचा देखील विदेश उल्लेख केला आहे. ‘तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देणारे तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन आणि शिवसेनेचे मी आभार मानते.’ असं त्या म्हणाल्या आहेत.

ममतादीदी बंगालच्या वाघीण !

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी काल एका ट्विटद्वारे शिवसेनेचा ममता बॅनर्जी यांना पाठींबा असल्याचं जाहीर केलं. यावेळी ते म्हणाले, ‘‘शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अनेक जणांच्या मनात उत्सुकता आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थिती पाहता ही निवडणूक ‘दीदी विरुद्ध सगळे’ अशी होणार आहे. सर्व एम – मनी (पैसा), मसल्स (शक्ती) आणि मीडिया ‘म’मतादीदींच्या विरोधात वापरले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ममता दीदींना गर्जना करणारे यश मिळो. आमच्या मते त्याच खऱ्या बंगाली वाघीण आहेत.’

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!