मुंबई : पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबई मधील निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
विशेष म्हणजे बंगालमध्ये भाजप आपल्या पक्षाला स्थानिक चेहरा देण्यासाठी शोध घेत असताना मुळचे बंगाली असणारे मिथुन आणि सरसंघचालकांची भेट महत्त्वाची मानली जात होती. या निवडणुकांच्या अनुशंघाने भाजप मिथुन यांच्यावर काही जबाबदारी सोपविणार असल्याची देखील चर्चा रंगू लागली होती.
आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या ७ मार्च रोजी ते पश्चिम बंगालमध्ये भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची बाब समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनीही पश्चिम बंगालचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी भाषणात पश्चिम बंगालच्या जनतेला परिवर्तन हवं असल्याचं सांगितलं होतं. पश्चिम बंगालमधील हिंदू मतपेटीसाठी भाजपकडून नवनवे प्रयत्न केले जात आहे. त्यात आता मिथून चक्रवर्ती यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपला किती फायदा होतो, हे पाहण औत्सुक्याचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार असल्याचा भाजपचा दावा
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जे.जे. रुग्णालयात घेतला कोरोना लसीचा डोस
- अखेर कावासाकी निंजा 300 ही बाईक लाँच !जाणून घ्या किंमत
- मोबाईल टॉवर्सकडे कोट्यवधी थकित, पालिका नेमणार खासगी एजन्सी
- रिलायन्स कर्मचाऱ्यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफात लस…


