Share

पिंपरी-चिंचवड पुण्यापेक्षा वढचर; महापालिकांच्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये चौथं स्थान पटकावलं !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी काल देशातील १११ शहरांचे सर्वेक्षण करून सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर, सर्वोत्तम महापालिका कामगिरी ची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले शहरे व १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे असे विभाग करण्यात आले होते.

सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महापालिकेच्या यादीत (१० लाखांहून अधिक लोकसंख्या) उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडने पुणेकरांना मागे टाकत चौथं स्थान पटकावलं आहे. तर, पुणे महापालिकेला पाचवं स्थान मिळालं आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला ५९ गुण तर पुणे महापालिकेला ५८.७९ देण्यात आले आहेत. दरम्यान, इंदौर महापालिका ६६.०८ गुणांसह देशात अव्व्ल ठरली आहे.

सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या यादी टॉप-१० मध्ये महाराष्ट्रातील ३ महापालिकांचा समावेश झाला आहे. यात, पिंपरी-चिंचवड, पुणे व ग्रेटर मुंबईने स्थान मिळवलं असून ग्रेटर मुंबईला आठवं स्थान देण्यात आलं आहे.

दरम्यान, देशातील १११ शहरांपैकी राहण्यायोग्य म्हणजेच Ease of Living (दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेलं शहर) मध्ये कर्नाटकची राजधानी व टेक-हब म्हणून देशात नावारूपाला आलेल्या बंगळुरु या शहरांना अव्वल स्थान पटकावलं आहे. तर, विद्येचे माहेरघर तर राज्यातील आयटी नगरी म्हणून नावाजल्या जाणाऱ्या पुणे शहराने दुसरं स्थान पटकावलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!