Share

रिषभ पंतच्या झुंजार खेळीने इंग्रजांची दाणादाण ! मात्र…

Published On: 

पुणे : भारत आणि इंग्लड संघात आज वनडे मालिकेचा तिसरा व अखेरचा सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यासाठी इंग्लंड संघाचा प्रभारी कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्याने हा सामना निर्णायक ठरणार आहे.

भारतीय संघाची सुरुवात ही चांगली झाली. सलामीच्या जोडीने शतकी भागिदारी केल्याने भारतीय संघाची स्थिती मजबूत झाली. संघाच्या १०३ धावा झाल्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. यानंतर लगेचच शिखर धवन व कर्णधार विराट कोहली देखील माघारी परतले. यानंतर, के एल राहुल व रिषभ पंतने चांगली भागिदारी रचण्याचा प्रयत्न केला मात्र ७ धावा करून संघ १५७ धावांवर असताना राहुल देखील बाद झाला.

तर, रिषभ पंत व हार्दिक पांड्याने भारतीय संघासाठी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी मोठं योगदान दिलं. तब्बल ४ षटकार व ५ चौकार ठोकत रिषभने ६२ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या. मागील सामन्यात देखील पंतने षटकारांचा पाऊस पाडला होता. तर, या सामन्यात देखील पंतच्या आक्रमक खेळीने इंग्लंडच्या संघाची दाणादाण उडाली होती. तो शतकी खेळी करेल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र, सॅम कुरण च्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. दीड वर्षांच्या कालावधीनंतर पंत वनडे मालिका खेळत आहे. हार्दिक पांड्या देखील ४४ चेंडूंमध्ये ६४ धावा करून माघारी परतला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!