नाशिक : राज्यातले महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अनेकविध प्रयत्न करूनही यश येत नसल्याचे पाहून भाजप हा निराश व वैफल्यग्रस्त झालला आहे. राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी भोंग्यांचे वाटप करून तणाव निर्माण करायचा व नवहिंदू ओवेसी विरुद्ध खरा हिंदू यांच्यात दंगली घडवून महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा कट शिजत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
या संदर्भातील पुरावे इंटीलीजेंसच्या हाती लागले असून, गृहमंत्रालय त्यावर काम करीत आहे असे संजय राऊत म्हणाले. दंगलीचा आधार घेऊन राज्यपालांकरवी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचाही प्रयत्न यामागे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. नाशिक भेटीवर आलेल्या संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर थेट तर राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली.
सध्या पोथी ठेवून हनुमान जे चालिसा वाचत आहेत, त्यांना हनुमान चालिसाविषयी एवढीच धार्मिकता आहे तर चालीसा त्यांच्या तोंडपाठ असायला हवी. राष्ट्रगीत, वंदे मातरम ज्यांना म्हणता येत नाही, त्यांनी हनुमान चालीसा विषयी ढोंग सुरु केला आहे, असे संजय राऊत म्हणाले. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या विजयाने भोंग्यांचे राजकारण संपुष्टात आल्याचे सांगून, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भोंगे वाटप व हनुमान चालीसा वाचनाचे राजकारण केले जातेय, असे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

