मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली सतत खराब फॉर्मशी झुंज देत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या जात असलेल्या सामन्यात नाणेफेकीचे नाणे ऋषभ पंतच्या बाजूने पडले, त्यानंतर त्याने बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ज्याला प्रत्युत्तर म्हणून रॉयल १९० च्या मोठ्या धावा केल्या. आरसीबीच्या १९० चा पाठलाग करताना दिली संघ २० षटकात केवळ १७३ धावा करू शकला. ज्यामुळे आरसीबीने १६ धावांनी विजय मिळवला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. पॉवरप्लेच्या आतच संघाचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. ज्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली (Virat kohli) ४१व्या षटकात धावबाद झाला. त्यानंतर मॅक्सवेलने ३४ चेंडूत ५५ धावांची खेळी करत आरसीबीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आणले. तर ग्लेन मॅक्सवेल बाद झाल्यानंतर या हंगामात आरसीबीसाठी फिनिशरची भुमीका बजावणारा दिनेश कार्तिक (dinesh kartik) फलंदाजीस आला. कार्तिकने फलंदाजी करताना ३४ चेंडूत ६६ धावा केल्या.
दिल्ली फलंदाजीसाठी उतरल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने (david warner) ६६ धावा करत दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. मात्र दुसऱ्या टोकावर विकेट पडत गेल्या. कर्णधार ऋषभ पंतनेही ३४ धावांची खेळी करत लक्ष्य गाठण्यास योगदान दिले. मात्र आरसीबीच्या गोलंदाजीसमोर दिल्लीचे फलंदाज गार झालेले दिसले. आरसीबीकडून जॉश हेजलवूडने ३ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे आरसीबीने दिल्लीला १६ धावांनी परास्त केले आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : अरेरे..! मुंबईला हरवल्यानंतर केएल राहुलला मिळाली ‘मोठी’ शिक्षा; भरावे लागणार ‘इतके’ लाख!
- IPL 2022 DC vs RCB : विराटच्या हंगामातील दुसऱ्या रनआऊटमुळे चाहते निराश; ट्विटवरून दर्शवली नाराजी!
- IPL 2022 DC vs RCB : वानखेडेवर घोंगावलं ‘कार्तिक’वादळ..! बंगळुरूचं दिल्लीला १९० धावांचं आव्हान
- IPL 2022 : “ते नक्कीच प्लेऑफमध्ये पोहोचणार…”, यंदाच्या विजेत्याबाबत रवी शास्त्रींची ‘मोठी’ भविष्यवाणी!
- IPL 2022 : मुंबईचा सलग सहावा पराभव; हतबल रोहित शर्मा म्हणतो, “मी माझ्या अनुभवाचा…”


