Share

IPL 2022 : अरेरे..! मुंबईला हरवल्यानंतर केएल राहुलला मिळाली ‘मोठी’ शिक्षा; भरावे लागणार ‘इतके’ लाख!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात लखनऊने मुंबईचा पराभव केला. कप्तान रेएल राहुलने लखनऊसाठी नाबाद शतक ठोकले. मुंबईचा हा सहावा पराभव ठरला. चांगल्या सामन्यानंतरही राहुलला दंड ठोठावण्यात आला आहे.

राहुलला १२ लाख दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राहुलला शिक्षा सुनावण्यात आली आहे. सामन्यात लखनऊला मर्यादित षटकांची गती राखता आली नाही. या संथ गतीमुळे राहुलवर कारवाई करण्यात आली आहे.

सामन्याबाबत…

आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सला सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावलेल्या केएल राहुलच्या लखनऊने दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईला २० षटकात २०० धावांचे आव्हान दिले. मुंबईच्या गोलंदाजी विभागात पुन्हा गफलत पाहायला मिळाली, शिवाय क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे राहिले. लखनऊच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची फलंदाजीही ढेपाळली. २० षटकात मुंबईला ९ बाद १८१ धावांपर्यंतच पोहोचता आले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!