🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीवर ‘टॉयलेट’ घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे किरीट सोमय्या पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे सोमय्यांच्या टॉयलेट घोटाळ्याचे कागदपत्रे आहेत. त्यांनी खोटी बिले दाखवून पैसे वसूल केले आहे. पालिका आयुक्तांचा अहवाल आपल्याकडे आहे. त्यामुळे सोमय्यांना पुन्हा एकदा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. तर सोमय्या यांनी राऊत यांचे आरोप फेटाळले होते. आरोपात काही तथ्य नाही. त्यांच्याकडे एकही कागद नाही. नेहमीप्रमाणे त्यांनी हा केलेला आरोप आहे. असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.
संजय राऊत यांच्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांनी नगर विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना पत्र लिहिले आहे. संजय राऊत यांनी माझ्यावर केलेले आरोप हे राजकीय हेतूंनी प्रेरित आहे. काही झालं तरी या संबंधी कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आमच्याशी संपर्क साधावा, आम्हाला विचारणा करावी. अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. ‘मीरा भाईंदर महानगरपालिका आणि राज्यात काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. सोमय्या हे युवा प्रतिष्ठाण नावाचे प्रतिष्ठाण चालवत होते. त्यांनी खोटी बिले देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाला अशी कारणे दाखवून हा घोटाळा झाला आहे. हा एकूण १०० कोटींचा घोटाळा आहे,’ असे संजय राऊत म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या :

