मुंबई : प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat Movie) चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सर्वपरिचित झाली. त्यानंतर तिच्या आर्ची या पात्राने तिला खूप लोकप्रियता ही मिळवून दिली. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. नुकतच ती एका अभिनेत्यासोबत डिनर डेटला (dinner date) गेली होती. त्याच्यासोबतचे फोटो शेअर करताच तिच्या अफेअरच्या चर्चेस उधाण आले आहे.
दरम्यान रिंकू मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यासोबत डिनर डेटला गेली होती. त्याच्यासोबतचे फोटो तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. गेल्या काही दिवसांपासून रिंकूच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगल्या आहेत.चाहत्यांना मात्र जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली आहे की, कोण आहे तो. त्याच्यासोबत अफेयर असल्याच्या चर्चा ही रंगल्या आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर सैराटमधील तिचा सहकलाकार आकाश ठोसर (Aakash Thosar) सोबतचे फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की डिनर डेट.
तसेच तोच फोटो आकाश ठोसरने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले की, खूप खाल्लं यार. उद्या जरा जास्त कार्डिओ करायला लागणार. तसेच रिंकू राजगुरूने आकाश ठोसरने तिचा तिच्या गाडीतला व्हिडीओ पोस्ट केलेला शेअर करून लिहिले की, लवकरच पुन्हा भेटू. यामुळे त्यांच्यातील अफेअर असल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

रिंकू राजगुरूबद्दल सांगायचं झाल्यास सैराटनंतर ‘मेकअप’, ‘कागर’ या मराठी चित्रपटांमध्ये दिसली होती. तसेच तिने ‘१००’,’अनपॉज्ड’,’२०० हल्ला हो’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. त्यानंतर लवकरच आता ती ‘छुमंतर’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. तर अभिनेता आकाश ‘लस्ट स्टोरीज’,’१९६२ द वॉर इन दी हिल्स’ या सीरिजमध्ये काम केले आहे. तसेच ‘एफ यू-फ्रेंडशीप अनलिमिटेड’ या चित्रपटात तो झळकला होता. आता पुन्हा या दोघांबद्दल चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अभिनेत्री शबाना आजमी यांना कोरोनाची लागण
- यंदाचाही ‘अर्थहीन’ अर्थसंकल्प; अजित पवारांची प्रतिक्रिया
- Budget 2022: क्रीडा क्षेत्रातही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आजपर्यंतचे सर्वात छोटे अर्थसंकल्पीय भाषण!
- या अर्थसंकल्पातून गरीबांचा जास्तीत जास्त गळा आवळून श्रीमंतांना आणखी श्रीमंत करण्याचा प्रयत्न-हेमंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

