मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्याच सोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. मात्र या अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. यात कॉंग्रेस (Congress) तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी देखील जोरदार टीका केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना टीका केली आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्णपणे फसल्यानंतर यंदा ६० लाख नोकऱ्यांचे नवे गाजर दाखवण्यात आले आहे, अशी टीका पवारांनी केली आहे. तसेच हा अर्थसंकल्प पुढच्या २५ वर्षांच्या विकासाची ब्ल्यूप्रिन्ट असल्याचा दावा निरर्थक असून निवडणूका असलेल्या पाच राज्यामधल्या जनतेची मनधरणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला, असंही यावेळी अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काय मिळाले हे शोधूनही सापडणार नाही, असा टोला लगावत पवार म्हणाले, यंदाचाही अर्थसंकल्प हा ‘अर्थहीन’ अर्थसंकल्प आहे. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
अर्थसंकल्पावर कॉँग्रेसची नाराजी; अर्थमंत्री आणि पंतप्रधानांवर केली टीका
विलासराव देशमुख म्हणायचे, विरोधकांना चांगले काम दिसेल असा चष्मा तयार करा-अमित देशमुख
‘हे अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चुहा’; छगन भुजबळांची टीका
IPL २०२२: आयपीएल ऑक्शनसाठी मोठ्या खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर
दिशा पटानीने केली जबरदस्त बॅकफ्लिप, पाहून टायगर श्रॉफ झाला थक्क्!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

