मुंबई : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केले. ज्यात क्रीडा क्षेत्रालाही अनेक वर्षानंतर चांगली आर्थिक वाढ मिळाली आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यानंतर केंद्रानेही खेळाडूंना प्रोत्सहन देण्यासाठी बजेटमध्ये वाढ केली आहे.
सरकार २०२२- २३ च्या अर्थसंकल्पात केवळ खेळांचा हिस्सा १५ टक्क्यांनी वाढवत नाहीये तर खेलो इंडिया मोहिमेत तब्बल साडेतीन टक्क्यांनी वाढ करणार आहे. २०२१ – २२ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात खेळांसाठी एकूण १९०६.१४ कोटी रुपये आले होते. मात्र यावेळी क्रीडा मंत्रालयाच्या बजेटमध्ये एकूण २२५४ कोटी रुपयांचे बजेट प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये एकट्या खेलो इंडियाचे बजेट ६५७ कोटींवरून ९७४ कोटी रुपये करण्यात आले आहे.
भारतीय क्रीडा क्षेत्रात गेल्या वर्षी अनेक मोठे बदल आले आहेत. विशेष म्हणजे टोकियो ऑलिंपिकनंतर क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांकडेही लक्ष दिले जात आहे. मागील सुधारित अर्थसंकल्पात क्रीडा महासंघांची रक्कम २८० वरून १८१ कोटी करण्यात आली होती. मात्र यावेळी ही टोकियो २८० कोटींचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे . तसेच यावेळी साईच्या वाट्याला ६५३ कोटी रुपये येणार आहेत. २०२१ – २२ मध्ये, SAI चे बजेट ६६० कोटी होते, जे सुधारित बजेटमध्ये ५९९ कोटी करण्यात आले आहे. मणिपूरमध्ये तयार होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बजेट ५१ वरून ९१ कोटी करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विलासराव देशमुख म्हणायचे, विरोधकांना चांगले काम दिसेल असा चष्मा तयार करा-अमित देशमुख
- ‘हे अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चुहा’; छगन भुजबळांची टीका
- IPL २०२२: आयपीएल ऑक्शनसाठी मोठ्या खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर
- दिशा पटानीने केली जबरदस्त बॅकफ्लिप, पाहून टायगर श्रॉफ झाला थक्क्!
- BUDGET 2022: शेतकरी, सामान्य नागरिक, युवा वर्गाला निर्मला सीतारमन यांच्याकडून ठेंगा; इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

