🕒 1 min read
नांदेड: मोदी सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पाने सुद्धा देशातील शेतकरी व सर्व सामान्यांची घोर निराशा केली आहे. दरवर्षी हा अर्थसंकल्प निवडणुका डोळयासमोर ठेवून सादर केला जातो यंदाही देशातील अनेक राज्यात असलेल्या निडवणूका हेच उद्दिष्ट असल्याचे दिसून येते. गरीबांचा जास्तीत जास्त गळा आवळून श्रीमंतांना आणखी किती श्रीमंत करता येईल असा प्रयत्न या अर्थसंकल्पातून होताना दिसून येतो, अशी प्रतिक्रिया खासदार हेमंत पाटील(Hemant Patil) यांनी दिली आहे.
आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली. तब्बल ६० लाख नव्या नोकऱ्या, ४०० नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी बजेटची ओपनिंग केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीत मोठी गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा केली आहे.
याबाबत नांदेडचे खासदार हेमंत पाटील म्हणाले, हा नेहमीप्रमाणे आभासी आणि फसवा अर्थसंकल्प आहे. मराठवाडयातील रेल्वे विकासाबाबत कुठेही उल्लेख नाही. कृषी उद्योगांना प्रोत्साहन मिळेल अशी कोणतीही तरतूद नाही त्याच बरोबर जीएसटीसाठीही कोणत्याही ठोस धोरणाची घोषणा नाही. सर्वसामान्य जनतेला प्राधान्यक्रमाने सदैव भेडसावणाऱ्या गरजांचा कुठेही उल्लेख नाही. एकीकडे वाढत्या महागाईच्या ओझ्याखाली आणि कोरोनामुळे जनता भरडली जात असतांना कर सवलतीमध्ये कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही. आपल्या कृषी प्रधान देशात शेतकरी आणि कृषी विभागाला दिलासा मिळेल. असे कोणतेही आशादायी निर्णय घेण्यात आले नाहीत. त्यामुळे देशातील शेतकरी हा पुन्हा एकदा कर्जाच्या खोल खाईत जाणार. हे या अर्थसंकल्पावरून दिसून येते.
महत्वाच्या बातम्या:
-
IPL २०२२: आयपीएल ऑक्शनसाठी मोठ्या खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर
-
दिशा पटानीने केली जबरदस्त बॅकफ्लिप, पाहून टायगर श्रॉफ झाला थक्क्!
-
“देशातील दोनचार श्रीमंत आणखी किती श्रीमंत होत जातात पाहूच”, संजय राऊतांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
-
‘अर्थसंकल्पात देशवासीयांची फसवणूक’; शिवसेना नेते विनायक राऊतांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
