🕒 1 min read
मुंबई : राज्यसह देशात कोरोना (corona) संसर्ग रूग्ण संख्येत वाढ होत असतांना दिसत आहे. सर्वसामान्यांसह बॉलिवूडतील बऱ्याच सेलिब्रिटींना देखील कोरोना संसंर्ग झाला. आता शबाना आजमी (Shabana Azmi) यांना कोरोना पॉझिटिव्ह (Covid 19) आल्याचं त्यांनी सोशल मीडियावर (social media) सांगितलं आहे.
दरम्यान शबाना आझमी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून (instagram) आपल्या चाहत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती शेअर केली आहे. त्यांना कोरोना झाल्यानंतर त्या सध्या क्वॉरंटाईन आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो सुध्दा शेअर केला आहे. पोस्टद्वारे त्या म्हणाल्या की, मी स्वत:ला क्वॉरंटाईन करून घेतल आहे. त्यामुळे माझ्यासोबत संपर्क आलेल्या सगळ्यांनी काळजी घ्यावी असं त्यांनी आवाहन केले आहे. या पोस्टवर दिव्य दत्ता, फॅशन डिझायन मनीष मल्होत्रा, बोनी कपूर,सोहा अली खान यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांना कमेंटद्वारे काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. तसेच चाहत्यांनी देखील त्या लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना देखील करत आहेत.
नुकतचं बॉलिबूडची अभिनेत्री काजोल (kajol) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. तिस-या लाटेत अनेकजण पॉझिटिव्ह असल्याचे आपण पाहतोय. तसेच कोरोनाने बॉलिवूडकरांना देखील सोडलं नाही. आतापर्यंत बऱ्याच कलाकारांनी कोरोना झाल्याचा अनुभव शेअर केला आहे. त्याचबरोबर काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘हे निवडणुकीचं बजेट’; आदित्य ठाकरेंची टीका
- नितेश राणेंना मोठा धक्का; सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
- “माझं कुठलं पात्र तुम्हाला आवडतं?”, दीपिका पादुकोणच्या प्रश्नावर पती रणवीर उत्तरला…
- सोयगाव नगरपंचायतीमधील ४ सदस्यांचा भाजपला रामराम; शिवसेनेत प्रवेश, सत्तारांचा रावसाहेब दानवेंना झटका!
- आगामी वेस्टइंडीज विरुद्ध इंडिया टी-२० मालिकेसाठी ममता बनर्जी सरकारचा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
