Share

श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह ईतर सर्वांना व्यवस्थेबाहेर ठेवतात- प्रकाश आंबेडकर

Published On: 

मुंबई: मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा मुद्दा महाराष्ट्रात गाजत असताना आता यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह ईतर सर्वांना व्यवस्थेबाहेर ठेवतात असं त्यांनी म्हटलं आहे. आता यावरून वादंग होण्याची शक्यता आहे. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कॉंग्रेस ही पक्ष या मुद्द्याचा आपल्याला कसा फायदा होईल हे बघत असताना आता प्रकाश आंबेडकरांच्या या विधानाने वेगळी दिशा या प्रकरणाला मिळू शकते.यावर आता चर्चा सुरू झाली आहे.त्यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान मोदी यांना एकत्रितपणे निवेदन द्यावे, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. संभाजीराजेंनी यासंदर्भात सर्व खासदारांना उद्देशून एक पत्र लिहले आहे. यामध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे संभाजीराजे यांनी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आता मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्रात हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रीमंडळाची बैठक घेऊन या प्रश्नावर चर्चा केली असून महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढावा कि नाही यावर चर्चा झाल्याची सुत्रांकडून माहिती आहे.याआधी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावर तोडगा निघाला नाही तर सरकारला जबर किंमत मोजावी लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावले होते.आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी एक वेगळी भूमिका घेतलीअसून मराठा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची रणनीती आखल्याची माहिती आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा खटला घटनापीठाकडे पाठवला असला तरी शैक्षणिक आणि नोकर भरतीमधील आरक्षणाला स्थगिती दिली आहे. दुसऱ्या राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या आरक्षणाला अशाप्रकारे स्थगिती दिली गेली नसल्याचे दिसून येते. उदा. तामिळनाडू मधील आरक्षण प्रश्नांचा सुद्धा अजून निकाल लागला नाही, तरी तेथील राज्याने दिलेले आरक्षण चालू आहे. केंद्राने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला १० टक्के आरक्षण दिले आहे. तेदेखील न्यायालयात आले आहे. परंतु केंद्र सरकारच्या शैक्षणिक आणि नोकर भरतीला स्थगिती देण्यात आलेली नाही. म्हणून मराठा आरक्षणाला न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे, ती उठवण्यात आली पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!