मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वादाने राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. हिंदी मिडिया मधील काही पत्रकार या प्रकरणात चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र ६ महिन्यांपासून देशातील आणि राज्यातील रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था, मेटाकुटीला आलेला शेतकरी, भविष्य अंधारात असलेले विद्यार्थी यांच्याकडे सोयीस्करपाने दुर्लक्ष होत आहे.
यावरच बोट ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, आरोग्याचे प्रश्न महत्वाचे असलेलं अधोरेखीत केले आहे. ‘(काही)पत्रकार बांधवांनो कंगना प्रकरण संपलं असेल तर आता शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, आरोग्याचे असे अनेक प्रश्न राज्यासमोर आहेत. महाराष्ट्र सरकार एकहाती या सर्व संकटाला झुंज देते आहे. ही वेळ महाराष्ट्राला सावरण्याची’. अस ट्विट करत मिटकरी यांनी खऱ्या मुलभूत प्रशांना वाचा फोडली आहे.
(काही)पत्रकार बांधवांनो कंगना प्रकरण संपलं असेल तर आता शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, आरोग्याचे असे अनेक प्रश्न राज्यासमोर आहेत. महाराष्ट्र सरकार एकहाती या सर्व संकटाला झुंज देते आहे. ही वेळ महाराष्ट्राला सावरण्याची.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 13, 2020
दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात गेली होती. कंगनाच्या वांद्र्यातील कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. साधारण 40 मिनिटे दोघांची चर्चा झाली.
मात्र कंगना रनौत आणि राज्यपालांच्या या भेटीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सडकून टीका केली आहे. ‘कंगनावर झालेला अन्याय ऐकण्यासाठी राज्यपाल महोदयांनी तिला तात्काळ भेट दिली. पण वर्षांनुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्याची तत्परता मा.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दाखवतील काय..?’ असा सवाल रविकांत तुपकर यांनी विचारला आहे.
कंगनावर झालेला अन्याय ऐकण्यासाठी राज्यपाल महोदयांनी तिला तात्काळ भेट दिली. पण वर्षांनुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्याची तत्परता मा.राज्यपाल @BSKoshyari दाखवतील काय..? @ANI
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) September 13, 2020
महत्वाच्या बातम्या
- कंगनाला राज्यपाल भेटले पण तीच तत्परता शेतकऱ्यांना भेटण्यात दाखवतील का ?
- एका महिलेने वाघाची शेळी केली, भाजप नेत्याचा घणाघात
- केंद्र सरकार ढासळती अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्यांवरुन पळ काढत आहे- खा.सुप्रिया सुळे
- गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध लढा उभारावा, अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं – आंबेडकर
- सोलापूर पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई, 10 जणांना अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

