सोलापूर : सोलापूर शहरातील मोदी खाना येथील मोकळ्या मैदानात काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती सदर बझार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली असता पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारत कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 10 संशयित आरोपीना ताब्यात घेतलं आहे.
संबंधितांकडून 7 हजार 900 रुपये आणि पत्ते असा मुद्देमाल मिळून आल्याची माहिती सदर बझार पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली आहे. शहरामध्ये अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडत असल्यास सोलापूर पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन सोलापूर पोलिसांकडून करण्यात आलं.
पहा काय म्हणाले पोलीस निरीक्षक संजय पाटील :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/744841446365106
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

