Share

साईमंदिर खुले करा, मनसेचे शिर्डीत आंदोलन!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- शिर्डी येथील साईबाबा मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. राज्यातील मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे खुली झाली तर राज्य सरकारच्या तिजोरीत भर पडणार आहे. शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर बंद असल्याने येथील अर्थकारण ठप्प झाले असून व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. साई मंदिर दर्शनासाठी खुले करावे, संस्थानच्या कर्मचाऱ्यांचे पगार कपात करू नये, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी साष्टांग दंडवत घालत साईबाबांना साकडे घातले.

शिर्डीचे साईबाबा मंदिर खुले करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगर-मनमाड महामार्गावरून मोर्चा काढून घोषणाबाजी करत मनसे नेते बाळा नांदगावकरांसह शेकडो कार्यकर्ते प्रवेशद्वार क्रमांक चार लगत जमा झाले होते. ह्या मोर्चाला पोलिसांनी रोखले व बाळा नांदगावकर यांच्यासह पाच जणांना आत प्रवेश देण्यात आला.

साईबाबा मंदिरासमोर नांदगावकर यांनी साष्टांग दंडवत घातल्यावर त्यांच्यासह पाच पदाधिकाऱ्यांनी संस्थान प्रशासकीय इमारतीमध्ये जाऊन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बगाटे यांची भेट घेतली. या भेटीत साई मंदिर खुले करण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

यावेळी मनसेचे संपर्क अध्यक्ष अनिल चितळे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते, तालुकाध्यक्ष राजेश लुटे, विजय मोगले, गणेश जाधव, लक्ष्मण कोतकर, सचिन डफळ, देविदास खेडकर, सलीम शेख, नगरसेवक योगेश शेवरे, गणेश जाधव, विकी कांबळे, राहुल देशमुख, कैलास भुजबळ आदींसह राहता तसेच कोपरगाव तालुक्यातील मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!