नवी दिल्ली: देशात कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. अशा वेळी केंद्र सरकारने या मुद्द्यावर चर्चा करणं गरजेचं असताना सरकार मात्र या मुद्यांवर बोलणं टाळत असल्याची टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. त्यात त्यांनी ही भूमिका मांडली. संसदेच्या पहिल्या दिवसापासून आपण या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कोरोनाच्या परिस्थितीचा फटका हा सगळ्यांना बसला आहे, पण आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असंही त्यांनी नमूद केले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. यामध्ये महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली. त्यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान म्हटले की, सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि बेरोजगारी हे आपल्या देशासमोरील प्रमुख मुद्दे आहेत. आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच या मुद्द्यांवरील चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
This is a global scenario & we're not the only country going through it. But it should be priority of govt. I don't see this govt at the Centre talking extensively either about the economy or unemployment challenges. We should put it on priority: NCP's Supriya Sule in Lok Sabha https://t.co/yli6z5zGtp
— ANI (@ANI) September 14, 2020
कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची फटका केवळ आपल्या देशालाच बसलेला नाही. जगभरात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या मुद्द्यालाच प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, केंद्र सरकार अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या समस्येविषयी फार काही बोलताना दिसत नाही. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
आज अधिवेशनला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी प्रश्नोत्तराचा तास वगळल्यावरून सरकारवर टीका केली. प्रश्नोत्तराचा तास हा सुवर्ण अवधी असतो. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीचे कारण देत सरकारने प्रश्नोत्तराचा तास रद्द केला. तुम्ही संसदेचे इतर सर्व कामकाज सुरु ठेवलेत केवळ प्रश्नोत्तराचा तास वगळलात. तुम्ही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहात, अशी टीका अधिर रंजन चौधरी यांनी केली.
दरम्यान, आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून भारत-चीन तणाव, बेरोजगारी, महागाई आणि कोरोना अशा मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. आज संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंडित जसराज, छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, राज्यपाल लालजी टंडन, चेतन चौहान आणि माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह या दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर एका तासासाठी लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- कंगनाला राज्यपाल भेटले पण तीच तत्परता शेतकऱ्यांना भेटण्यात दाखवतील का ?
- महाराष्ट्रातील मराठा खासदार आरक्षणासाठी मोदींना निवेदन देणार- खा.छत्रपती संभाजीराजे
- मोदींच्या अहंकारी स्वभावामुळे कोरोनाचा उद्रेक-राहुल गांधी
- संगमनेरमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान प्रभावीपणे राबवा- बाळासाहेब थोरात
- मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढता येत नाही- श्रीहरी अणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

