मुंबई : काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियात केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात घेतली आहे.
‘या महिन्यात क्रिकेटच्या पीचवरून चांगली बातमी मिळाली. आपल्या क्रिकेट टीमने सुरुवातीच्या अडचणींवर मात करत शानदार पुनरागमन केलं आणि ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकली. खेळाडूंची कठोर मेहनत आणि त्यांचं टीम वर्क प्रेरणा देणारं आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात हा विजय प्रेरणादायी असल्याचे म्हटले होते. मात्र, मोदी यांच्या या प्रशंसेनंतर विराट कोहली सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले होते. मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केल्या गेलेल्या ट्वीट मध्ये लिहिले होते, “या महिन्यात क्रिकेटच्या खेळपट्टीवरून खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या क्रिकेट संघाने सुरुवातीच्या अडचणींनंतर शानदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली. खेळाडूंची मेहनत आणि संघकार्य प्रेरणादायक आहे.”
पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्वीटला भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीने रिट्विट करत भारतीय ध्वजाची इमोजी पोस्ट केली. मात्र, त्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले की, “अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात हा विजय मिळवला गेला आहे. तू त्याचे श्रेय घेऊ नकोस.” अन्य एका चाहत्याने लिहिले की, “तू स्वतः या प्रवाहापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.”
???????? https://t.co/jGez2Na675
— Virat Kohli (@imVkohli) January 31, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘ऋण समाधान योजने’ला मिळाली मुदतवाढ; १६ हजार शेतकरी कर्जमुक्त
- चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना मिळणार मैदानात प्रवेश पण…
- इराण, इस्रायल आणि अरब राष्ट्र संघर्षाचे रक्तरंजित पडसाद भारतावर उमटणार नाही यासाठी खबरदारी घ्यावीच लागेल – सामना अग्रलेख
- आयपीएलचे साखळी सामने महाराष्ट्रात तर, बाद फेरी अहमदाबादेत
- बडोद्याचा पराभव करत सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी तमिळनाडूने आपल्या नावे केली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

