Share

मुंबई : भाजपाच्या इशाऱ्यानंतर अखेर वृक्ष छाटणीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणात मंजूर

Published On: 

मुंबई – तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील २ हजार ३६४ झाडांची पडझड झाली. तसेच ८१५ वृक्ष उन्मळून पडले. याबाबत भाजपने १८.०३.२०२१ पासून विनाकारण प्रलंबित वृक्ष छाटणी कंत्राटाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समितीच्या बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत, सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्याचा गंभीर इशारा सत्ताधाऱ्यांना दिला होता. त्यानंतर खडबडून जागे होत सत्ताधारी आणि प्रशासनाने सोमवारी वृक्ष प्राधिकरणाची बैठक बोलावली. या बैठकीत वृक्ष छाटणीचा प्रस्ताव तातडीने मंजूर केला. भारतीय जनता पक्षाच्या दणक्यामुळेच वृक्ष छाटणीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मंजूर केल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.

मुंबईतील धोकादायक झाडांची छाटणी आणि मृत झाडांची कापणी करण्यासाठी प्रशासनाने कंत्राटदारांची निवड करण्यासाठी निविदा मागवली होती. याबाबतचा प्रस्ताव १८ मार्चला वृक्ष प्राधिकरण समितीसमोर आला होता. मात्र,सत्ताधारी आणि प्रशासनाच्या अर्थरंजित भ्रष्ट कारभारामुळे हा प्रस्ताव प्रलंबित राहिला. परिणामी, तोक्ते वादळात ८१५ झाडे उन्मळून पडली.वृक्ष प्राधिकरणाने वेळीच वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असता तर मार्च-एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणी झाली असती. त्यामुळे भार हलका झाल्याने शेकडो झाडे वाचली असती.

वृक्ष प्राधिकरण कायद्यानुसार समितीची बैठक दर २१ दिवसांनी होणे बंधनकारक आहे, असे असताना २३ मार्च २०२१ पासून ६० दिवसांत वृक्ष प्राधिकरणाची एकही बैठक झाली नाही. वृक्ष छाटणीचा इतका महत्वाचा प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने मुंबई शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या ८१५ प्राचीन वृक्षांचा वध झाला. याला संपूर्णतः सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार असल्याची टीका भाजपा गटनेते श्री. शिंदे यांनी केली. आता हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे महापालिकेने तोंडावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर वृक्ष छाटणी केली पाहिजे असे मत नगरसेवक अभिजीत सामंत यांनी व्यक्त केले.

उदवाहनारूढ स्वयंचलित यांत्रिकी करवत यंत्राची खरेदी कधी?

वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत भाजप नगरसेवक अभिजीत सामंत यांनी हरकतीचा मुद्याद्वारे आयुक्तांच्या निदर्शनास आणले की,वर्ष २०१८ मध्ये महापालिकेने उदवाहनारूढ स्वयंचलित यांत्रिकी करवत यंत्र विकत घेण्यासाठी रु. ५ कोटींची आर्थिक तरतूद केली होती. परंतु अद्याप ३ वर्षानंतरही या यंत्राची महापालिकेने खरेदी केलेली नाही. त्यामुळे उंच झाडांची वृक्ष छाटणी महापालिका कर्मचारी करू शकत नाहीत. ही खरेदी महापालिका, प्रशासन सत्ताधारी कधी करणार आहेत? तसेच पावसाळ्यापूर्वी तयारीचा एक भाग म्हणून वृक्ष छाटणीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ अशासकीय संस्थांमार्फत उपलब्ध केले जाते. यावर्षी असा प्रस्ताव विचाराधीनही नाही काय?  चक्रीवादळ, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्तीमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमधील पडलेली/ कोसळली झाडे महापालिकेनेच स्वखर्चाने उचलावीत याबाबत प्रशासनाचे धोरण काय? यानंतर सदर हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!