जालना: कोरोना सोबतच आता नव्या आजाराचा म्हणजेच म्युकरमायकोसिस या आजाराचा वेगाने फैलाव होताना दिसत आहे तासेक त्याचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे आधीच या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडे चिंता असताना त्यात आता या आजारामुळे आणखी भर पडली आहे. मात्र आता म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, त्यांच्यावर जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व इतर तीन खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
म्यूकरमायकोसिसचा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्यात आला असून जालन्यात जिल्हा रुग्णालय तसेच स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, जालना हॉस्पिटल व दीपक हॉस्पिटलमध्ये या आजारावर मोफत उपचार केले जातील. यात दीड लाख व त्यावरील रक्कमही शासनामार्फत भरण्यात येणार असल्यामुळे म्यूकरमायकोसिसचा उपचार खर्च मोफत होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने सोमवारी आयोजित आढावा बैठकीत मंत्री टोपे बोलत होते.
बैठकीत टोपे म्हणाले, म्यूकरमायकोसिसबाबतचे फ्लेक्स रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावावेत. या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याचा दर वाढत असून हा संसर्ग रोखण्यासाठी आयसीएमआरच्या सूचनेनुसार हाय रिस्क व लो रिस्क सहवासितांचा अचूक शोध घेऊन त्यांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात यावी. याबरोबरच जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण गृह विलगीकरणात राहणार नाही, याची खबरदारी घेत संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश टोपे यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई : भाजपाच्या इशाऱ्यानंतर अखेर वृक्ष छाटणीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणात मंजूर
- धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटणार! ३१ मे रोजी ‘जागर’ करण्याचे गोपीचंद पडळकरांचे आवाहन
- लहान मुलांकरिता स्वतंत्र कोविड सेंटरची उभारणी करा; महापालिका आयुक्तांकडे भाजपची मागणी
- सोनाली कुलकर्णीच्या घरी चोरीचा प्रयत्न ; वडिलांवर चोरट्याचा हल्ला
- आयर्लंडमध्ये ‘ही’ महिला क्रिकेटपटू मानते बुमराहला आदर्श
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

