🕒 1 min read
सांगली : मराठा आरक्षणाचा तिढा कायम आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यातच आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी येत्या 31 मे रोजी धनगर समाजाने जागर करावा, असे आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी काळात धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटणार असल्याचा अंदाज आहे.
धनगर आरक्षणाचा जागर करून या महाविकास आघाडीला आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी समस्त धनगर समाजाला धनगरी वेशात केले आहे. धनगर आरक्षणाचा निर्धार मनाशी पक्का करायचा आहे. यंदा कोविडमुळे जयंती मोठ्या स्वरूपात साजरी करता येणार नाही. परंतु आपल्या घरातूनच सर्वांनी आपल्या धनगरी पोशाखात अहिल्यामातेला वंदन करून जयंती उत्सव साजरा करायचा आहे.
३१ मे रोजी यंदा कोविडमुळे आपल्याला घरातूनच सर्वांनी आपल्या धनगरी पोशाखात #अहिल्यादेवींना वंदन करून जयंती उत्सव साजरा करायचा आहे. मी चौंडी येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना वंदन करताना फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे. pic.twitter.com/jzTXwRUjwm
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) May 25, 2021
चौंडी (ता.जामखेड) येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना वंदन करताना फेसबुक लाईव्हद्वारे गोपीचंद पडळकर धनगर समाजाला संवाद साधणार आहेत. त्यावेळी कमेंटमध्ये आपले पारंपारिक पोशाखातील फोटो टाकून आपली ताकद दाखवन्याचे आव्हान पडळकर यांनी केले आहे.या माध्यमातून धनगर आरक्षणाचा जागर करायचा आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.
आघाडीच्या गड्यांना हादरा द्यायचाय
महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एकही योजना लागू केली नाही किंवा एक रुपयाही धनगर समाजाला दिला नाही. महाविकास आघाडीच्या गड्यांना आपल्याला हादरा द्यायचा आहे. म्हणून महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाची लाट असल्याने सोशल मीडियावरून या जागरमध्ये सामिल व्हा, असं आवाहन त्यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘..तेव्हा आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू’, संजय राऊतांची मार्मिक प्रतिक्रिया
- ‘प्रियंका, कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही’
- दिलासा! म्यूकरमायकोसिसवरील उपचार सरकारी योजनेतूनच होणार
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
