Share

…तो परत येतोय, भारताचा वेगवान गोलंदाज टी नटराजन पुनरागमनासाठी सज्ज

Published On: 

मुंबई : भारताचा आघाडीचा गोलंदाज यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ओळख असलेला टी नटराजन हा दुखापतीतून सावरला आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने आयपीएल स्पर्धेतुन माघार घेतली होती.

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा आघाडीचा गोलंदाज टी नटराजन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला होता. यानंतर कोरोनाच्या शिरकावामुळे आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यानंतर नटराजनच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर तो दुखापतीतुन हळुहळु सावरत होता. सनरायझर्स हैदराबाद संघाने एक ट्विट करत याची माहिती दिली आहे. तो लवकरच दुखापतीतून सावरत आहे. तो लवकर बरा व्हावा म्हणून त्याला शुभेच्छा द्या असे ट्विट सनरायझर्सने ट्विट केले.

आयपीएल २०२० मध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने या संधीचा पुरेपुर फायदा घेत चांगली कामगिरी केली होती आणि आपली निवड सार्थ ठरवली होती. त्या दौऱ्यातील आखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात देण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. जुलै महिन्यातील श्रीलंकेविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकेत त्याला संधी मिळु शकते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!