Share

उसने घेतलेले इंजेक्शन परत करा; खासगी रुग्णालयांना आता जिल्हा रुग्णालयाकडून तिसऱ्यांदा स्मरणपत्र

Published On: 

बीड: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती त्यामुळे अशा परिस्थितीत रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा भासू नये म्हणून जिल्हा रुग्णालयाकडून खासगी रुग्णालयांना उसनवारी तत्त्वावर रेमडेसिविरचा पुरवठा केला गेला होता. दरम्यान, आता रुग्णसंख्या घटली असून रेमडेसिविरची मागणीही कमी आहे. त्यामुळे उसने इंजेक्शन्स खासगी रुग्णालयांनी परत करणे अपेक्षित आहे. मात्र, खासगी रुग्णालयांनी यासाठी टाळाटाळ सुरू केली आहे. जिल्हा रुग्णालयाने शनिवारी तिसऱ्यांदा या रुग्णालयांना पत्र पाठवून इंजेक्शन परत करण्याची आठवण कौन दिली आहे तसेच त्वरित परत करण्याचे सूचना दिल्या आहेत.

कोरोना रुग्णाच्या फुप्फुसांमध्ये संसर्ग होऊ नये यासाठी रेमडेसिविर या इंजेक्शनचा वापर केला जातो. या इंजेक्शनची मोठी मागणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढली होती व बाजारपेठेत याचा तुटवडा होता. यामुळे हे इंजेक्शन उपलब्ध करताना रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी धावपळ होत होती, तर गैरफायदा घेत काही जणांनी याचा काळाबाजारही समोर आला होता. रेडेसिविरसाठी नातेवाइकांना होणारा त्रास पाहता पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सीईओ व सीएस यांनी खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयाच्या औषधी भांडारातून उसनवारी तत्त्वावर इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला होता.

आता रुग्णसंख्याही कमी झाली आहे. रेमडेसिविरचा वापरही कमी झाल्याने बाजारपेठेत इंजेक्शनची उपलब्धता आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातून इंजेक्शन देणे बंद केले आहे. आता खासगी रुग्णालयांनी उसने घेतलेले इंजेक्शन परत करणे आवश्यक आहे. मात्र, दोनदा पत्र पाठवूनही इंजेक्शन परत करण्यास टाळाटाळ केली. नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी शनिवारी सर्व रुग्णालयांना तिसऱ्यांदा स्मरणपत्र पाठवत इंजेक्शन परत करण्याच्या सूचना केल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!