Share

लव्ह जिहाद कायद्याबाबत पुनर्विचार करा; मायावतींचा योगींना सल्ला

Published On: 

🕒 1 min read

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये बेकायदेशीर धर्म परिवर्तन अध्यादेशाला राज्यापालांची मंजूरी मिळाल्यानंतर बरेलीमध्ये या अंतर्गत प्रकरण नोंदवण्यात आले आहे. बरेलीत ‘लव्ह जिहाद’ च्या आरोपात नव्या कायद्यांतर्गत एफआयआर देखील नोंदवण्यात आला.

यूपी कॅबिनेटने 24 नोव्हेंबर रोजी ‘बेकायदेशीर धर्मांतरण बंदी विधेयका’ला मंजूरी दिली आहे. सरकारचं म्हणणं आहे की या कायद्याद्वारे महिलांना सुरक्षित करण्याचा आमचा उद्देश आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने प्रस्तावित केलेल्या वटहुकमास राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, राज्यातील विरोधी पक्ष आता या कायद्याविरोधात मैदानात उतरू लागले आहेत. आधी समाजवादी पार्टी आणि आता बसपा अध्यक्षा मायावती यांनी देखील योगी सरकारला या निर्णयाबद्दल पुनर्विचार करावा असे म्हटले आहे.

‘लव्ह जिहाद’बद्दल उत्तर प्रदेश सरकारने आणलेला धर्मांतराविरोधी वटहुकूमाबद्दल अनेक शंका आहेत. खरतर देशात जबरदस्ती व कपटाने धर्मांतरणास विशेष मान्यताही नाही व स्वीकृती नाही. या संबंधी अनेक प्रभावी कायदे अगोदरपासून आहेत. सरकारने यावर पुर्नविचार करावा ही बसपाची मागणी आहे.

उत्तर प्रदेशात विवाहाच्या नावाखाली सक्तीच्या आणि फसवून केलेल्या धर्मातराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या वटहुकमानुसार आता फसवून किंवा सक्तीने धर्मातर घडवून आणल्यास आरोपीला १० वर्षे तुरुंगवास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा दिली जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!