Share

शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग

Published On: 

मुंबई : शिवसेनेनं मुंबईमध्ये एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा भाजपच्या टीकेनंतर भलतीच चर्चेत आली असून आयोजक शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी देखील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे.

शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी या स्पर्धेसंदर्भात टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचं माझ्या मनात आलं. अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस देण्यात येईल. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार आहे,’ असं ते म्हणाले.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूका २०२२ मध्ये होणार असल्या तरी भाजप पाठोपाठ आता शिवसेना देखील या निवडणुकांसाठी सक्रिय होत असल्याचं दिसून येत आहे. भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा शुद्ध भगवा फडकावणार असल्याची गर्जना केली होती. यानंतर, शुद्ध भगव्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच आता या स्पर्धेच्या अरोजनावरून देखील भाजप नेते शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!