जयपूर : भारतीय जनता पक्षाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे राजस्थानमधील राजसमंद येथे निधन झाले. काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या किरण माहेश्वरी यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते.
किरण माहेश्वरी यांना २८ ऑक्टोबरला कोरोना झाल्याचे समजले होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उदयपूरच्या गीतांजली ह़ॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना एअरलिफ्ट करून गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर तेथ उपचार सुरु होते.
राजसमंदच्या आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनाची माहिती मिळताच उदयपुरात शोकाकूल वातावरण आहे. वसुंधरा सरकार असताना किरण माहेश्वरी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती.
किरण या राजस्थानातील दुसऱ्या आमदार आहेत ज्यांचं कोरोना विषाणूमुळे निधन झाले. यापूर्वी सहाडाचे काँग्रेसचे आमदार कैलाश त्रिवेदी यांचेही कोरोना विषाणूमुळे निधन झाले होते.जेष्ठ नेत्या आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला.
Prime Minister Narendra Modi condoles the demise of BJP leader and MLA from Rajasthan's Rajsamand, Kiran Maheshwari.
"She made numerous efforts to work towards the progress of the state and empower the poor as well as marginalised," tweets PM Modi. https://t.co/bo2ue1Z39i pic.twitter.com/QGDXBS3coy
— ANI (@ANI) November 30, 2020
आपल्या भावना ट्वीटरद्वारे व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,किरण माहेश्वरी यांच्या आकस्मिक निधनावर दु:ख झाले. खासदार, आमदार किंवा राजस्थान सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी तसेच गरीब आणि वंचितांच्या सबलीकरणासाठी अनेक कार्य केले. परिवारातील सदस्यांना संवेदना. ओम शांती.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारबाबत असणारी नाराजी आगामी निवडणुकीतून दाखवून देईल : दानवे
- ‘…पण मुस्लीम उमेदवारला तिकीट देणार नाही’ भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, लोकसेवा आयोगाच्या परिक्षा होणार कधी?ठाकरे सरकारवर दानवे बरसले
- ‘ही सरकारच्या कामांची वर्षपूर्ती नव्हे तर लोकोपयोगी कामांचे विद्यमान सरकारने घातलेले वर्षश्राद्ध’
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

