🕒 1 min read
सांगली:- मागील अनेक महिन्यापासून कोरोनामुळे सगळे व्यवहार ठप्प होते. तसेच जनावराचे बाजार देखील बंद होते. मात्र आता हळूहळू बाजार सर्वत्र भरत आहेत. सांगलीच्या आटपाडीतील जनावरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. बाजारात मेंढ्या, जनावरांबरोबरच तब्बल दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा विक्रीसाठी आला होता. हा बकरा या बाजारातील उत्सुकतेचा विषय ठरला होता. त्या एका बोकडाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सांगलीतील आटपाडी येथे कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने बाजार भरला होता. या बाजारात पशुपालकांनी विक्री आणि खरेदीसाठी हजेरी लावली होती. सांगोला तालुक्यातील बाबुराव मेटकरी या व्यक्तीने आपला बकरा विक्रीसाठी आणला होता आणि त्याची विक्रीसाठी किंमत तब्बल दीड कोटी रुपये लावली होती. विशेष बाब म्हणजे हा बोकड खरेदी करण्यासाठी एका व्यक्तीने ७० लाख रुपयांची बोली लावली होती. पण बाबुराव मेटकरी यांनी हा बोकड ७० लाखांना विक्री करण्यास नकार दिला.
याच बाजारात आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या मेंढीला 13 लाख रुपये इतकी मागणी झाली. ही मेंढी प्रसिद्ध मोदी बकऱ्याचे पिल्लू आहे. त्यांनी ती दोन लाखाला खरेदी केली होती. सोमनाथ जाधव यांच्या अन्य तीन मेंढ्या तब्बल नऊ लाख रुपयांना शेतकऱ्यांनी मागितले. तर मासाळवाडी येथील शिवाजी तळे यांच्या सात महिन्याच्या मेंढीला चार लाख रुपयांची मागणी आली. सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांचा मोदी नावाचा प्रसिद्ध बकराही बाजारात दाखल झाला. त्याचा दर दीड कोटी इतका आहे. तर त्याला सत्तर लाखाची मागणी करण्यात आली. अनेक महिन्यानंतर सुरू झालेला जनावरांचा बाजारातून शेतकऱ्यांना बोकड, मेंढीच्या विक्रीतून चांगला पैसा मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कदायक : कोरोनाशी महिनाभर झुंज देणाऱ्या भाजप आमदाराचे निधन
- ‘महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही’
- कायद्यांना नाव शेतकऱ्यांचे पण फायदा अब्जाधीश मित्रांनाचं; प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका!
- हुतात्मा नितीन भालेराव अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंतिम संस्कार
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंगमोडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
