Share

‘ही सरकारच्या कामांची वर्षपूर्ती नव्हे तर लोकोपयोगी कामांचे विद्यमान सरकारने घातलेले वर्षश्राद्ध’

Published On: 

परभणी : महाविकास आघाडी सरकार एक वर्षपूर्ती सोहळा साजरा करत आहे परंतु खऱ्या अर्थाने लोकोपयोगी एकही काम न करणाऱ्या या सरकारला वर्षपूर्ती साजरी करण्याचा अधिकार नाही ही शासनाच्या कामांची वर्षपूर्ती नसून लोक लोक उपयोगी कामांचे सरकारने घातलेले वर्षश्राद्ध आहे अशी घणाघाती टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.

काल परभणी येथे हॉटेल ग्रीनलीफ या ठिकाणी आयोजित महा विकास आघाडीच्या सरकारचे अपयश मांडण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पक्षाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी आमदार विजयराव गव्हाणे, माजी आमदार मोहनराव फड, भाजपा परभणी शहर जिल्हा अध्यक्ष आनंद भरोसे, भाजपा परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, बाबासाहेब फले, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश देशमुख, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश चिटणीस अजय गव्हाणे, भाजपा युवा मोर्चा परभणी शहर जिल्हाध्यक्ष रामदास पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल करताना लोणीकर म्हणाले की मराठवाडा वॉटर ग्रीड ही मराठवाड्याचे भाग्य बदलणारी महत्त्वाकांक्षी योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झाली. या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना उद्योगधंद्यांना मुबलक पाणीपुरवठा करून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न तत्कालीन सरकारच्या माध्यमातून केला जात होता. परंतु दुर्दैवाने सरकार मध्ये फेरबदल झाला आणि विद्यमान सरकारने मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसत मराठवाडा वॉटर ग्रीड सारखे मराठवाड्याचे भाग्य बदलणारी योजना स्थगित केली हे मराठवाड्याचं दुर्दैव मानावे लागेल अशा शब्दात लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी महापौर ढगफुटी झाली त्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले त्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या घोषणा विद्यमान सरकारकडून करण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात मात्र एकही रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी दिले परंतु प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याच्या विश्वासघात करत आघाडी सरकारने हे शेतकऱ्यांचा सरकार नाही असंच सिद्ध केलं आहे. अतिवृष्टी, महापूर, ढगफुटीची तुटपुंजी मदत फक्त जाहीर करण्यात आली परंतु प्रत्यक्षात मात्र मदत मिळालीच नाही या सरकारने शेतकऱ्यांचे पार वाटोळं केलं अशा शब्दात लोणीकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

विरोधी पक्षात असताना विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सरकारमध्ये असणारे विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बागायती शेतीला 1 लाख तर कोरडवाहू शेतीला 50 हजाराची मदत करा अशी मागणी वारंवार केली होती. परंतु प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर मात्र एकही रुपयाची मदत शेतकऱ्यांना यांनी केलेली नाही. शेतकऱ्यांची जास्त अपेक्षा नाही किमान विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जो शब्द दिला होता तेवढा जरी पाळला तरीसुद्धा बळीराजा खूश होईल.  सवलती देण्याबाबत शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत या सरकारची भावना नाही शेतकऱ्यांना वेठीस धरून आपली राजकीय पोळी भाजण्याचा मध्ये हे तिन्ही पक्षाचं सरकार मशगुल असल्याची टीका देखील यावेळी लोणीकर यांनी केली.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारच्यावतीने शेतकऱ्यांना दिला जाणारे सोयाबीन चे बियाणे बोगस निघाले असून जालना विभागात २९ हजार क्विंटल तर परभणी विभाग अंतर्गत ९२ हजार क्विंटल बोगस सोयाबीन बियाणे विक्री करण्यात आले. यामध्ये खाजगी कंपन्यांसह महाराष्ट्र सरकारच्या बियाणे महामंडळाचा देखील समावेश आहे असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!