कर्नाटक : कर्नाटकमधील बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होणार आहे. याचसंदर्भात बोलताना राज्याचे ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमध्ये महत्वाचं मंत्रीपद असणाऱ्या ईश्वरप्पांनी भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये कोणत्याही मुस्लीम उमेदवाराला तिकीट देण्यास नकार दिला आहे. बेळगाव हे हिंदूंचे केंद्र असून त्याचे समर्थन करणाऱ्यालाच तिकीट दिलं जाईल अशं ईश्वरप्पा म्हणाले आहेत.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी ईश्वरप्पा यांनी यासंदर्भात भाष्य केलं. “आम्ही हिंदू समुदायातील कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट देऊ शकतो. कुरुबा, लिंगायत, वोक्कलिबा किंवा ब्राह्मण समाजातील कोणत्याही व्यक्तीला आम्ही तिकीट देऊ. मात्र एक गोष्ट नक्की आहे की मुस्लिमांना आम्ही तिकीट देणार नाही,” असं ईश्वरप्पा म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, “भाजपा वगळता कोणत्याही पक्षामध्ये लोकशाही नाहीय,” असंही ते म्हणालेत.
We might give the party ticket to any community of Hindus. Whoever we might give it to — maybe Lingayats, Kurubas, Vokkaligas, or Brahmins but definitely, it will not be given to Muslims: KS Eshwarappa, Karnataka Minister & BJP leader (29.11.2020) pic.twitter.com/0cA1Lchqz4
— ANI (@ANI) November 30, 2020
महत्वाच्या बातम्या
- उदयनराजेंचे ‘ते’ वक्तव्य धक्कादायक आणि आक्षेपार्ह आहे : सचिन सावंत
- मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार
- दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो – राज्यपाल
- भारताने मालिका गमावली पण या पट्ठ्यानं मनं जिंकली!
- केंद्राकडून नेमके किती येणे बाकी आहे यावर आधी एकमत करा; दरेकरांचा सत्ताधाऱ्यांना टोला


