Share

पैठण येथे भूमिगत गटार योजनेच्या कामाला पुन्हा सुरुवात, दर्गाजवळील ‘तो’ वाद संपुष्टात

Published On: 

 

औरंगाबाद : पैठण आपेगाव प्राधिकरण योजने अंतर्गत शहरात सुरु असलेल्या भुमीगत गटार योजनेच्या अंतिम टप्यातील कामाला पुन्हा सुरवात करण्यात आली असुन लवकरच हे काम पुर्णत्वाकडे जाणार असल्याचे मत उपअभियंता उमल चांदेकर व कंत्राटदार विनायक महाजन यांनी व्यक्त केले आहे.

अनेक समस्यांमुळे शहरातील भुमीगत गटार योजनेचे काम रखडले होते, शेवटी या योजनेचे काम अंतिम टप्यात जात असतांना मौलाना साहेब दर्गाजवळ खोदकामावर परीसरातील लोकांनी हरकत घेतल्याने पुन्हा काम बंद पडले होते.

यावेळी या कामावर स्वतः जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लक्ष देऊन प्रकरण निकाली काढण्याचे आदेश तहसिलदार चंद्रकांत शेळके यांना दिले होते. तहसिलदार शेळके यांनी एमजेपीचे आधिकारी आणि इतर सर्वांसोबत बैठक घेऊन यशस्वी तोडगा काढला. त्यानुसार या योजनेच्या अंतिम चरणातील कामाला सुरवात झाली. कामाला सुरवात करतांना आज मौलाना दर्गा परीसरात एमजेपीचे उपअभियंता उमल चांदेकर, ठेकेदार विनायक महाजन, शाखा अभियंता एस. एस. सरोदे, अभियंता आहेमद शेख, साईड ईन्चार्ज सिध्दार्थ रोडगे आदींची उपस्थीती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!