Share

ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज मध्यरात्री पासून जाणार संपावर

Published On: 

पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारडून कडक निबंध देखील लागू केलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित दुकानेही बंद ठेवण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.

कोरोनाचा उद्रेक सुरु असताना दुसरीकडे पुण्याच्या ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. तातडीने बेड उपलब्ध करुन मनुष्यबळ वाढवा ही या डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे.

काय आहेत डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या :-

  • मनुष्यबळाशिवाय बेड वाढवल्यामुळे रुग्णांवरील उपचाराचं व्यवस्थापन कोलमडून जाईल
  • बेड तर तयार करण्यात येतील पण त्यासाठी आवश्यक असणार मनुष्यबळ, साधनसामुग्री प्रशासनाकडे आहेत का?
  • दुसऱ्या लाटेची कल्पना डिसेंबर २०२० मध्येच आली असताना शासनाकडून कोणतीही पूर्वतयारी करण्यात आली नाही
  • कोव्हिड ड्युटी करणाऱ्या डॉक्टर्सला क्वारंटाईन किंवा आयसोलेशन ची सुविधा नाही त्यामुळे आमचे ८० निवासी डॉक्टर्स एका महिन्यात कोरोनाने बाधित झाले
  • आम्ही दीड महिन्यापासून प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजनांसाठी विनंती करत असून त्यावर कोणतेही उपाय केले गेले नाहीत

दरम्यान, आज पुण्यातील ससून रुग्णालयात कॅज्युअल्टी वार्डमधील आणखीच भयानक परिस्थिती समोर आली आहे. याठिकाणी एकाच बेडवर प्रत्येकी तीन-तीन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. विशेष म्हणजे कॅज्युअल्टी वॉर्डची रुग्ण क्षमता ४० एवढी आहे. पण ससूनमध्ये दररोज ६० नवीन कोरोना रुग्ण येत आहेत. याची वाढीव ताण या वॉर्डवर पडत आहेत. ससूनमध्ये नवीन रुग्ण दाखल झाल्यानंतर या वॉर्डातील रुग्ण हॉस्पिटलमध्ये इतरत्र हालवली जात आहे. ज्यामध्ये रुग्णांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन कारावा लागत आहे.

त्यामुळे अशा सर्व भीषण परिस्थितीत डॉक्टरांनी संपाचा बडगा उचलणे योग्य आहे का ? असे प्रश्न आता सर्वसामन्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!