नवी दिल्ली : देशात दररोज कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात अनेक राजकीय मंडळी देखील सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. यात आता केंद्र सरकारच्या प्रमुख मंत्र्यांचाही समावेश झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही कोरोना संसर्ग झाला असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
या संदर्भात प्रकाश जावडेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.’ जावडेकर यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोस घेतल्यानंतर जावडेकर यांनी पाच मार्च रोजी पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र, दुसरा डोस घेण्याआधीच त्यांना कोरोना संसर्ग झाला आहे.
I have tested #COVID positive today. All those who have come in contact with me in the last 2-3 days may please get themselves tested.
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) April 16, 2021
जावडेकर यांना कोरोना झाल्याची माहिती कळताच, देशातील अनेकांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह स्मृती ईराणी, धर्मेद्र प्रधान, राज्ज्वर्धन राठोड यांचा समावेश आहे. या आधी देखील मोदी सरकारमधील काही मंत्र्यांना कोरोना संसर्ग झाला होता. मात्र, अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जावडेकरांच्या संपर्कात आले नसल्याचे सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
- गुप्त धनाच्या लालसेपोटी ‘या’ परिसरात उत्खनन
- खळबळ! सचिन वाझे आणखी दोघांचे करणार होता एन्काऊंटर, ‘या’ मोठ्या व्यक्तीचे वाचले प्राण
- कोविड सेंटरचे व्यवस्थापन कोलमडले, सुनिल केंद्रेकरांनी लक्ष देण्याची मागणी
- ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली दिशाभूल की त्यांचीच दिशाभूल?


