🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सिडकोवासियांच्या प्रलंबित समस्या सोडवा, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यावेळी विशेषतः एन-४ भागातील हनुमान मंदिराजवळील धार्मिक विधी होत असलेल्या विहिरीची जागा पोलीस स्टेशनला देण्याबाबतचा निर्णय रद्द करण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे हा महत्त्वाचा निर्णय रद्द करण्यासाठी औरंगाबाद शहरातील शिवसेना शिष्टमंडळ व नागरिकांनी मुंबई येथे नगर विकास मंत्र्यांची भेट घेतली.
यावेळी औरंगाबाद येथील एन-४ सेक्टर ए व डी येथील बारव विहीरीची जागा सिडको विभागाकडून पोलीस स्थानकास देण्यात आली आहे. या निर्णयास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, एन-४ येथे एक जुनी बारव विहीर होती. त्या विहीरीत गणपती विसर्जन करण्यात येत होते. ही या भागातील हिंदू धर्मियांची अनेक वर्षाची परंपरा आहे. विहीरीच्या काठावर नागरिकांकडून एक दत्त मंदीराची व हनुमान मंदीराची स्थापना करण्यात आली आणि एक सुरेख हनुमान मंदीर बांधकाम झाले असून येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
ही वस्तुस्थिती आहे. या विहीरीचे ठिकाण वर्दळीच्या जागी झाल्याने व विहीरीच्या कठड्याची पडझड झाल्याने धोका टाळण्याच्या दृष्टीने विहीर बुझवण्यात आली आहे. त्या जागेवर आता पोलीस स्टेशनसाठी जागा दिल्याचे सिडको कडून समजले आहे. विहीरीची जागा मुळात धार्मिक वापराची जागा आहे. या बारव विहीरीवर पोलीस स्टेशन इमारत बांधकाम त्या धार्मिक जागेचे पावित्र्य भंग करण्याचे काम करण्यात येऊ नये अशी नागरिकांची भावना आहे.
सिडकोकडून या जागेचे वाटप झाले असेल तर तो निर्णय रद्द करावा. पोलीस स्टेशनसाठी इतर ठिकाणी जागा द्यावी. एन-२ येथील कम्युनिटी सेंटर इमारत सध्या महानगरपालिकेकडे असल्याचे समजते. याच धर्तीवर एन-४ येथील जागेचे वाटप सुध्दा रद्द करून एन-२ येथील कम्युनिटी सेंटरच्या राखीव इमारतीत जागा भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात यावा. तशा सूचना महानगरपालिकेला देण्यात याव्यात ही विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मला हवं तेव्हा ईडीला सामोरं जाईन’; अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण
- मोदींच्या कार्यकाळात एकही भ्रष्ट्राचाराची केस समोर आली नाही, अर्थ राज्यमंत्र्यांचा दावा
- औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे आयटीआयला प्राधान्य!
- वैजापूरात मुख्यमंत्री-प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते निकृष्ट; आ. बोरनारेंची ठाकरे सरकारकडे निधीची मागणी!
- ‘मोदी सरकारच्या दबावातून काही जण महावसुली म्हणत बोंबलत आहेत, पण..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
