औरंगाबाद : दरवर्षीप्रमाणे यंदाही आयटीआय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कायम आहे. जागांच्या तुलनेत आयटीआय अभ्यासक्रमाला दुपटीने विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती शासकीय आयटीआय अभ्यासक्रम (मुले) महाविद्यालयाचे प्राचार्य अभिजित आल्टे यांनी दिली. आतापर्यंत आयटीआय अभ्यासक्रमाला औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ७ हजार २३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
दरवर्षी आयटीआय अभ्यासक्रमाला सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी करत असतात. यावर्षी देखील आयटीआय अभ्यासक्रमाला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. दहावीचा निकाल लागताच आयटीआय अभ्यासक्रम अर्ज भरणे प्रक्रिया सुरू झाली. यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. मूल्यांकन करून दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. त्याच दिवशी आयटीआय अभ्यासक्रमाची ऑनलाईन अर्ज भरणे प्रक्रिया सुरू झाली आहे.
यावर्षी आयटीआय अभ्यासक्रम प्रवेशासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ११ शासकीय आयटीआय अभ्यासक्रम महाविद्यालयात एकूण २ हजार २२४ जागा तर ६ खासगी महाविद्यालयात एकूण ४३६ जागा आयटीआय अभ्यासक्रमाला भरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय आयटीआय महाविद्यालयात एकूण २ हजार ६६० जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज पाहिले तर औरंगाबाद जिल्ह्यातून आतापर्यंत ७ हजार २३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी आतापर्यंत ६ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी अर्ज देखील निश्चित केले आहेत.
एकूणच जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांनी दुपटीने अर्ज केल्याने यंदाही आयटीआय अभ्यासक्रमाला मागणी कायम असल्याचे स्पष्ट होते. मागील वर्षी १२ हजार आयटीआय अभ्यासक्रम प्रवेशासाठी मागील वर्षी म्हणजे २०२० मध्ये देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासक्रमाला अर्ज भरले होते. मागील वर्षीचा आयटीआय अभ्यासक्रम प्रवेशाला एकूण १२ हजार २२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून निश्चित केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानचा लाळघोटेपणा!, म्हणे, ‘जगाने तालिबानचे स्वागत करावे’
- औरंगाबादेत ‘धर्मरक्षक’ची यंदा मदतीची दहीहंडी; १०० क्विंटल धान्य पूरग्रस्तांना रवाना!
- ‘हा’ जोकर राहुल गांधींचा इतका खास का आहे याचा आता खुलासा झाला’, भाजपाचा टोला
- ‘वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरतीची प्रक्रिया लवकरच’, मंत्री अमित देशमुखांची माहिती
- ‘मला मोदींनी ओबीसींचे नेतृत्त्व करण्याची संधी दिली’; डॉ. कराडांचा रोख नेमका कोणाकडे?


