Share

वैजापूरात मुख्यमंत्री-प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते निकृष्ट; आ. बोरनारेंची ठाकरे सरकारकडे निधीची मागणी!

Published On: 

औरंगाबाद : वैजापूर-गंगापूर मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना या दोन योजनांतर्गत अनेक रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत. या रस्त्यांचा दुरुस्ती कालावधी (डिफेक्ट लाएबिलीटी) संपुष्टात आल्याने नव्याने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अशा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी आमदार रमेश बोरनारे यांनी केली आहे. याबाबत त्यांंनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सचिवांना पत्र पाठवले आहे.

या पत्रात त्यांनी तालुक्यातील जवळपास ३० किमी लांबीच्या चार रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. योजनेअंतर्गत वैजापूर ते म्हस्की या साडे आठ किमी लांबीच्या रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे. तसेच राज्य रस्ता क्रमांक १७९ ते चेंडुफळ (११ किमी), बल्लाळीसागज ते एकोडीसागज ( ६.३५ किमी) व राज्य रस्ता क्रमांक ४७ ते शिऊर ते राज्य रस्ता क्रमांक १६ ते बळ्हेगाव जिरी बोलठाण या १.७० किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत.

रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर नियमानुसार ठराविक कालावधीत (डिफेक्ट लाएबिलीटी) रस्ता निकृष्ठ झाल्याचे उघडकिस आल्यास त्या रस्त्याची दुरुस्ती करणे संबंधित कंत्राटदारास बंधनकारक असते. मात्र या रस्त्यांचा हा कालावधी संपल्याने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची गरज आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास रस्त्यांची दुरुस्ती करता येईल असे पत्रात म्हटले आहे. मुख्य अभियंता यांनाही याबाबत कळवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!