Share

‘कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकणे मोठा गुन्हा ठरेल’

Published On: 

इंग्लंड : विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला. गेल्या चार वर्षांत टीम इंडिया आयसीसीचे विजेतेपद गमावण्याची ही तिसरी वेळ आहे. तत्पूर्वी, २०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून त्यांचा पराभव झाला होता. २०१९ वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्यांदा  विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंग केलं आहे.

विराट कोहली हा कदाचित भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असेल, पण त्याच्याकडे एकही आयसीसी ट्रॉफी नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. ट्विटरवर चाहते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही वापरकर्ते कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वानने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची बाजू घेत एक महत्वाचे विधान केले आहे. स्पोर्ट्सस्किडाशी बोलताना स्वान म्हणाला, ‘विराट कोहली हा एक चॅम्पियन आणि सुपरस्टार खेळाडू आहे. त्याने भारतीय संघाला मजबूत बनवले आहे. विकेट पडल्यानंतर त्याचा स्वभाव पाहण्यासारखा असतो. जेव्हा एखादी चूक घडते तेव्हा आपणास त्याचा चेहरा दिसतो. तो किती उत्कटतेने खेळतो ते पाहा. तो आपल्या कामाबद्दल पूर्णपणे समर्पित आहे. जेव्हा आपल्याकडे असा कर्णधार असेल, तेव्हा त्याला कर्णधारपदावरून काढून टाकणे क्रिकेटविरूद्ध मोठा गुन्हा ठरेल.’ असे विधान स्वान यांनी यावेळी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!