औरंंगाबाद : सराफा बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पर्स लांबवत त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम आणि कापड बाजार पेठेतून कपडे चोरी केली असल्याची कबूली बुरखा गँगने पोलिसांना दिली आहे. सिटीचौक पोलिसांच्या नाकात दम आणणाऱ्या बुरखा गँगमधील आठ महिलांना सिटीचौक पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली आहे.
बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना हेरून त्यांच्या पर्समधुन अलगदपणे हि टोळी दागीने लंपास करीत होती अशी माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली. निलोफर जावेद सय्यद (वय २७), फौजीया इब्राहिम शेख (वय ४०, दोघी रा. मिसारवाडी), शबाना शेख जलील (वय ३२, रा. निजामगंज कॉलनी), अफरिन शेख हनिफ (वय ३१, रा. किराडपुरा), शबाना कुरेशी जमील कुरेशी (वय ३५, रा. शहाबाजार काचीवाडा), आशा श्रीराम बागुल (वय ४०, रा. करिम कॉलनी, रोषन गेट), शबाना सादीक कुरेशी (वय ३७, शहाबाजार) आणि ताहेराबेगम शेख इब्राहिम (वय ६०, रा. करिम कॉलनी, रोषनगेट) आशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बुरखा गँग मधील महिलांची नावे आहेत.
अटकेत असलेल्या निलोफर सय्यद आणि फौजीया शेख या दोघींना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे तर उर्वरित आरोपी महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…
- कर्णधार कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा, म्हणाला…
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

