Share

आंबिल ओढा कारवाईनंतर अजित पवारांची पुण्यातील आढावा बैठकीला दांडी; चर्चांना उधाण

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरात काल ( २४ जून ) सकाळी अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला होता. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली होती.

अखेर स्थानिकांच्या आक्रोशानंतर आणि पोलीस-स्थानिक यांच्या संघर्षानंतर न्यायालयाने या तोडकामास पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. तर, ऐन पावसाळ्यात घाईने करण्यात आलेल्या या कारवाईवर सर्वच पक्षीय नेत्यांनी नाराजी वर्तवली असतानाच ही कारवाई नेमकी कोणाच्या सांगण्यावरून झाली याबाबत अनेक चर्चा शहरात सुरु आहेत.

दरम्यान, दर शुक्रवारी पुणे जिल्ह्याच्या कोरोना स्थितीच्या आढाव्याची बैठीक कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असते. मात्र, आज अजित पवार हे या बैठकीला गैरहजर होते. तर, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे. सध्या अजित पवार यांच्या आजच्या गैरहजेरी नंतर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

पुण्यातील आंबिल ओढा प्रकरणातील विकासक अजित पवारांचा निकटवर्तीय असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर, दुसरीकडे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असतानाच त्यांची आजची गैरहजेरी चर्चेचा मुद्दा ठरली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!