Share

रहाणेच्या प्रवासाची आठवण करून देत राधिकाने केली टीकाकारांची बोलती बंद

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी खूप निराशाजनक कामगिरी केली. असेच काहीसे लीड्स कसोटी सामन्यातही घडले आणि भारतीय संघ वाईटरित्या पराभूत झाला.

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेची कामगिरीही या सामन्यात खूपच खराब दिसून आली. त्याने दोन्ही डावांमध्ये फक्त 28 धावा केल्या. अजिंक्य रहाणे सातत्याने धावा करण्यात अपयशी ठरला. अजिंक्य रहाणेच्या खराब कामगिरीनंतर त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. तसेच अजिंक्य रहाणेला टीम मधून बाहेर काढण्याची देखील मागणी होत आहे.

यावरच आता रहाणेच्या पत्नीने टीकाकारांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. राधिका धोपावकरने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेयर केली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.

राधिकाने ही पोस्ट शेअर करत रहाणेच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. पोस्ट शेअर करत राधिकाने लिहिले, ‘वर्षांचा हा काळ कसा गेला, काही कळलंच नाही. पहाटे 5 वाजताचा मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास, स्थानिक क्रिकेटमध्ये अनेक वर्षांची मेहनत आणि मग आपली पहिली आंतरराष्ट्रीय कॅप मिळवण्यासाठी पाहिलेली वाट, यासाठी तू खूप वाट पाहिलीस अजिंक्य. तू खूप चढ-उतार बघितलेस.

तुझं सगळ्या अडचणींविरोधात लढण्याचं साहस तसंच आहे. तू या प्रवासात प्रत्येक दिवशी आमची मान उंचावलीस. तुझ्यासोबत आता आणि कायमच उभी राहून मी खूश आहे, अशा आशयाची पोस्ट करत राधिकाने रहाणेच्या इथं पर्यंतचा प्रवास थोडक्या शब्दात सांगितला आहे.

महत्त्वाच्या बातम्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!