औरंगाबाद : शहरात सध्या साथ रोग विशेष: मलेरिया, डेंग्यू, काविळचे रूग्ण मोठया प्रमाणावर आढळत आहे. मनपाने अशा रुग्णांची तातडीने कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दवाखाने व रुग्णालयांना दिले आहेत. परंतु मनपाच्या या आदेशाला डॉक्टरांसह रुग्णालयांकडून खो दिला जात असल्याचे निदर्शनाला आले. यामुळे मनपा अशा रुग्णालयांना आता पुन्हा स्मरण पत्र देणार आहे.
शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरताच साथीचे आजार फोफावत आहे. यात मलेरिया, डेंग्यू, काविळ आदींचा समावेश आहे. परंतु या रुग्णांची साधी कोरोना चाचणी देखील झालेली नाही. कोणत्याही दवाखान्यात व रुग्णालयात साध्या तापेचा रुग्ण आल्यास विंâवा दाखल झाल्यास त्याची तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी असे पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील ९९६ रुग्णालये व दवाखान्यांना दिले आहे.
पत्र देवूनही आठ दिवस उलटले तरी एकही डॉक्टराने रुग्णांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला नाही. दोन ते तीन दिवस ताप सारखी येत असल्यामुळे रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी गेला तर डॉक्टरांकडून डेंग्यू, काविळची चाचणी करून घेण्याचे सांगितले जाते. त्यानंतर पॅथॉलॉजीच्या चाचणी अहवालावरून उपचार केले जातात. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचे कळत नाही. यामुळे संबंधित रुग्णालयांना पुन्हा एकदा पत्र देऊन याची आठवण करून दिली जाणार आहे. असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा
- राणेंच्या घराबाहेर वरुण सरदेसाईंची पोलिसांना अश्लिल शिवीगाळ, मनसेकडून व्हिडिओ पोस्ट
- राणेंच्या अटकेमुळे आम्ही घाबरणार नाही , दडपणार नाही- केंद्रीय मंत्री भारती पवार
- सरकारच्या जीवावर तुम्ही कोणाकोणाला त्रास देणार?; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

