Share

‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हैदोस माजलेले पाहायला मिळत आहे. याचे कारण आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेले आक्षेपार्ह विधान. या विधानामुळे संपूर्ण राज्यभारत तीव्र पडसाद उमट आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. नाशिक पाठोपाठ पुण्यात राणें विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील पोलिसांचे पथक रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना संगमेश्वरमध्ये येथून ताब्यात घेतलं आहे.

नारायण राणे यांना आता संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी बाहेरील परिसरात मोठी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आता यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे.

‘नारायण राणे विरोधात, ठाकरे सरकारचा कारवाईला आम्ही घाबरत नाही. घोटाळेबाजाना एक्सपोज़ करीत राहणार. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर नंतर आत्ता अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड वर कारवाई होणारच.’ अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला आहे.

तर आता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या भारती पवार यांनी देखील राज्यातील महाविकास आघाडीचा संचार घेतला आहे. ‘महाराष्ट्र सरकारकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही. सरकारचे हे कृत्य म्हणजे लोकांचा जन-आशीर्वाद यात्रेत भाजपाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे आहे.’ असा टोला त्यांनी ट्वीट करून लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!