Share

राणेंच्या अटकेमुळे आम्ही घाबरणार नाही , दडपणार नाही- केंद्रीय मंत्री भारती पवार

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. नाशिक पाठोपाठ पुण्यात राणें विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील पोलिसांचे पथक रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना संगमेश्वरमध्ये येथून ताब्यात घेतलं आहे.

नारायण राणे यांना आता संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी बाहेरील परिसरात मोठी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या भारती पवार यांनी देखील राज्यातील महाविकास आघाडीचा संचार घेतला आहे.

‘महाराष्ट्र सरकारकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही. सरकारचे हे कृत्य म्हणजे लोकांचा जन-आशीर्वाद यात्रेत भाजपाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे आहे.’ असा टोला त्यांनी ट्वीट करून लगावला आहे.

तर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी देखील नारायण राणे यांच्यावर केलेल्या कारवाईची निषेध केला आहे. ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही’. असे नड्डा म्हणाले आहेत. तर, भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेला मिळत असलेल्या मोठ्या प्रतिसादाला हे लोक घाबरले असल्याने अशी कारवाई होत असल्याचे देखील नड्डा म्हणाले आहेत. काहीही झाले तरी आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू जन-आशीर्वाद सुरूच राहणार असे जे.पी नड्डा म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!