Share

राणेंच्या घराबाहेर वरुण सरदेसाईंची पोलिसांना अश्लिल शिवीगाळ, मनसेकडून व्हिडिओ पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणे यांनी केलेल्या विधानामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यात शिवसेनेकडून थेट राणेंच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आल्याने वातावरण चिंताजनक झाले आहे. युवासनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी काही प्रमाणात दगडफेकही झाली. याचवेळी झालेल्या गोंधळात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे पोलिसांना अश्लिल शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मनसेचे अखिल चित्रे यांनी याबाबत ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून सरदेसाईंवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणले की,’वरूणजी तुमच्या सुसंस्कृतपणाचे आज दर्शन घडवल्याबद्दल तुमचे आभार !! वरुण सरदेसाई यांनी मुंबई पोलिसांची ” हिम्मत ” काढायची तुम्हाला गरज नाही, छातीवर गोळ्या खाऊन आमच्या मुंबईची रक्षा त्यांनी केली आहे, मुंबई पोलीस आम्ही तरी हे कधी विसरणार नाही’. असे म्हणत त्यांनी सरदेसाईंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आव्हान देण्याची भाषा राणेंकडून करण्यात आल्यानंतर आपण त्यांच्या बंगल्याबाहेर जमलो, मात्र उंदिर आधीच पळून गेले होते. नारायण राणेंना अटक व्हायलाच हवी. शिवसेनेचे पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यासाठी कुठलाही कायदा-सुव्यवस्था हातात घ्यायचे नाही. ज्यांनी आव्हान दिले ते आम्ही स्वीकारले. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नारायण राणे यांना अटक करायची ही मागणी करायची आहे. तसेच ज्या पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मारले त्यांनाही निलंबित करण्याची मागणी यावेळी वरुण सरदेसाईंनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!